CBSE 10th,12th Exam 2023 Date Sheets: सोशल मीडीयात सीबीएसई परीक्षांच्या तारखांचे Viral WhatsApp Messages खोटे; बोर्डाने दिली माहिती

यामुळे विद्यार्थ्यांना 10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षेची विषयानुसार तयारी करता येणार आहे.

Student | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

CBSE कडून यंदा कोविड पूर्व स्थिती प्रमाणे पुन्हा ऑफलाईन पद्धतीने 10वी,12वी च्या परीक्षा (CBSE 10th,12th Exam 2023 Datesheets) घेतल्या जाणार आहे. यामध्ये 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांचे आता वेध लागले आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या मनातील गोंधळाचा गैरफायदा घेत काही जण खोट्या वेळापत्रकाचे, परीक्षा तारखांचे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत. मात्र सीबीएससी कडून सोशल मीडीयामध्ये वायरल होणारे हे मेसेजेस खोटे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक जारी होईपर्यंत धीर धरावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

CBSE Controller of Exams Sanyam Bhardwaj यांनी Careers360 ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सध्या व्हॉट्सअ‍ॅप वर वायरल होत असलेले 12th datesheet खोटं असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सीबीएससी च्या 10वी,12वी परीक्षेच्या तारखा या महिन्यात जाहीर होऊ शकतात. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर पाहता येणार आहे.

फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज नुसार, 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू होतील. पहिला पेपर इंग्रजी असेल. आणि या परीक्षा 9 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षेचा शेवट लॅंग्वेज सब्जेक्ट्स आणि मास मीडीया स्टडीजने होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. CBSE Board Exam 2023: 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांसाठी Private Students Registration 17 सप्टेंबर पासून होणार सुरू.

सीबीएसई कडून यंदा सॅम्पल पेपर जारी केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना 10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षेची विषयानुसार तयारी करता येणार आहे. cbseacademic.nic.in वर हे सॅम्पल पेपर उपलब्ध असणार आहेत. दरम्यान यासोबतच मार्किंग स्किम देखील जारी करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif