CAT 2022: CAT परिक्षेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कशी असेल नोंदणी प्रक्रीया

3 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 10 वाजतापासून या CAT परिक्षेच्या रेजिस्ट्रेशन (registration) प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे.

Exam | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

CAT 2022 म्हणजे कॉमन अडमिशन टेस्टच्या (Common Admission Test) नोंदणी प्रक्रीयेला आजपासून  सुरुवात झाली आहे. https://iimcat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर (website) संबंधित माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तरी 3 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 10 वाजतापासून या  परिक्षेच्या रेजिस्ट्रेशन (registration) प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत नोंदणी प्रक्रीयेसाठी एक महिना 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजे 14 सप्टेंबर या दिवशी  CAT परिक्षेच्या नोंदणीचा शेवटचा दिवस असेल. तसेच या परिक्षेचं अडमिशन कार्ड 27 ऑक्टोबर 2022 पासून डाऊनलोड (Download) करता येणार आहे. तर 27 नोव्हेंबर 2022 रोजी CAT 2022 म्हणजे कॉमन अडमिशन टेस्ट घेण्यात येईल.

 

जाणून घ्या कशी कराल CAT 2022 परिक्षेसाठी नोंदणी :-

 

CAT 2022 परिक्षा देशातील १५० शहरात घेण्यात येणार आहे. फॉर्म भरताना विद्यार्थास त्यापैकी कुठलीही ६ शहर नमूद करायची आहेत. या परिक्षेचा एकूण कालवधी १२० मिनिट म्हणजे २ तास असेल. तर हा पेपर सेक्शन १, सेक्शन २ आणि सेक्शन ३ अश्या तीन भागांमध्ये विभागलेला असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif