BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात 7545 कॉन्स्टेबल पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रियेबद्दल अधिक

यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने येत्या 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (File Photo)

BSF Recruitment 2021: जर तुम्ही सीमा सुरक्षा दलात नोकरीसाठी अर्ज करु इच्छिता तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण BSF मध्ये 7 हजारांहून अधिक पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने येत्या 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. बीएसएफने 7545 कॉन्स्टेबलसह अन्य केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF) मध्ये कॉन्स्टेबल अॅन्ड आसाम रायफल्स मध्ये रायफलमॅनच्या एकूण 25271 पदावर नोकर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही SSC कडून केली जाणार आहे.(UPSC ESIC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ESIC मध्ये 150 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, 'असा' करता येईल अर्ज)

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये कॉन्स्टेबलच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in येथे भेट द्यावी लागणार आहे. वेबसाइटच्या होम पेजवर देण्यात आलेल्या लॉग-इन सेक्शनमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक लिंक दिली असेल. त्या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना येत्या 31 ऑगस्टची अंतिम तारीख दिली आहे. या तारखेच्या नंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचसोबत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना 2 हजार रुपयांचा शुल्क येत्या 2 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांना 4 सप्टेंबर पर्यंत बँक चालान एसएससीच्या वेबसाइटवरुन जनरेट करावे लागणार आहे.(Oil India Limited Recruitment 2021: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 535 जागांसाठी भरती, आयटीआय उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)

एसएससीने BSF सह सर्व दल कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक योग्यता ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा महाविद्यालयातून मॅट्रिकुलेशन किंवा दहावी उत्तीर्ण असावे. त्याचसोबत उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 18 वर्षाहून कमी किंवा 23 वर्षाहून अधिक नसावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1998 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा.