IPL Auction 2025 Live

BPCL Recruitment: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर शिकाऊ पदांसाठी भरती, करा आजचं अर्ज

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती केल्या जाणार आहे.

Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या (Unemployment) संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिक्षा देताना दिसतात पण त्यातही निवड होणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती केल्या जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

 

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येईल. उमेदवारांची निवड संबंधित पदवींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाईल. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल भरीतसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षांचं असावं. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही यामध्ये सूट देण्यात येणार आहे. रिक्त पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (हे ही वाचा:- FCI Job Recruitment: फूड कोर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मिळवा लाखांत पगार)

 

बीपीसीएल कोची यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 27 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. संबंधीत वेबसाईटवर पदाबाबतीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी अधिसूचना वाचावी तसेच दिलेल्या सुचनेप्रमाणे अर्ज भरावा अशा सुचना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात येत आहे.