IBPS Clerk Recruitment 2020: आयबीपीएस लिपिक भरती अंतर्गत 2557 पदांसाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; जाणून घ्या पात्रता आणि परीक्षेची तारीख
संस्थेने आयबीपीएस लिपिक भरती 2020 अंतर्गत 2557 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
IBPS Clerk Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आईबीपीएस) ने सीआरपी क्लर्क-X भर्ती 2021-22 अंतर्गत नाकारलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली आहे. संस्थेने आयबीपीएस लिपिक भरती 2020 अंतर्गत 2557 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी संस्थेने अधिकृत संकेतस्थळावर ibps.in जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत पात्रता (पदवी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अर्ज प्रक्रियेदरम्यान अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांसाठी आयबीपीएस लिपिक भरती 2020 अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली जात आहे. अर्ज करू इच्छित असणाऱ्या असे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सक्षम असतील. आयबीपीएसने या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले असून उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरता येतील. (हेही वाचा - NLC Recruitment 2020: एनएलसी मध्ये पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसच्या 500 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या डिटेल्स)
हे उमेदवार अर्ज करू शकतील?
आयबीपीएस लिपिक भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणारे उमेदवार 6 नोव्हेंबर 2020 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 28 वर्षांपेक्षा कमी नसतील.
या बँकांमध्ये होणार भरती -
- बँक ऑफ बडोदा
- कॅनरा बँक
- इंडियन ओवरसीज बँक
- युको बँक
- बँक ऑफ इंडिया
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- इंडियन बँक
- पंजाब आणि सिंध बँक
दरम्यान, आयबीपीएसने गेल्या महिन्यात विविध सार्वजनिक बँकांमध्ये 1557 लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. मात्र, नंतर रिक्त पदांची संख्या 2557 करण्यात आली होती. तसेच सीआरपी क्लर्क-X भरती 2021-22 च्या अधिसूचनेनुसार, प्राथमिक परीक्षा 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.