उच्च शिक्षणासाठी ब्रिटेन येथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ

याबाबत ब्रिटेनच्या उच्चयोगाने माहिती दिली आहे. ब्रिटेनकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार या वर्षात 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना टायर 4 (शैक्षणिक) व्हिजा देण्यात आला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

उच्च शिक्षणासाठी ब्रिटेन येथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची गेल्या वर्ष भरापेक्षा यावेळी 63 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. याबाबत ब्रिटेनच्या उच्चयोगाने माहिती दिली आहे. ब्रिटेनकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार या वर्षात 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना टायर 4 (शैक्षणिक) व्हिजा देण्यात आला आहे. गेल्या वर्षात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 19 हजार होती.

अहवालातून समोर आलेल्या आकड्यांनुसार गेल्या वर्षापेक्षा ब्रिटेन येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका विधानात असे सांगण्यात आले आहे की, गेल्या दशकात 2,70,000 भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटेनच्या उत्तम शैक्षणिक संस्थांचा फायदा झाला आहे. तसेच 5.12,000 पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना व्हिजा मिळणार आहे. भारतात ब्रिटिश उच्चायुक्त डॉमिनी अक्विथ यांनी असे म्हटले की, भारतीय विद्यार्थी खासकरुन ब्रिटेश येथे उच्च शिक्षणासाठी येणे सध्या पसंद करत आहेत. हे तिसरे वर्ष असून विद्यार्थ्यांची ब्रिटेन येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.(UK Work Visa आता दोन वर्षांसाठी; भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थांना मोठा दिलासा)

युके मध्ये सध्या स्थितीला पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर डिग्री, बॅचलर डिग्री घेतलेले विद्यार्थी अवघे 4-6 महिने नोकरी शोधण्यासाठी राहू शकत होते. मात्र आता या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. 2020-21 पासून कोर्स सुरू करणार्‍या विद्यार्थ्यांना या नव्या व्हिसा नियमाचा फायदा मिळणार आहे. अंडर ग्रॅज्युएट ते वरील सार्‍या कोर्ससाठी हा नियम लागू असेल. 2011 साली होम सेक्रेटरी असलेल्या थेरेसा मे यांनी शिक्षणानंतर 2 वर्ष व्हिसा देण्याच्या प्रस्तावाला नाकारले होते. 31 ऑक्टोबरपर्यंत करार करून वा कोणताही करार न करता युरोपियन युनियन सोडण्यावर नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ठाम आहेत.