RTE Admission 2021-22: आरटीई अंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून सुरु

दरम्यान शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर आणू नये अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांतील 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून सुरु होणार आहे. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक 11 जून 2021 पासून ते 30 जून 2021 पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर आणू नये अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वर क्लिक करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.हेदेखील वाचा- Maharashtra 10th Board Exam 2021: इयत्ता 10 वी परीक्षा मुल्यांकनाबाबत शिक्षण विभागाकडून तपशील जारी

पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-

फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच allotment letter ची प्रिंट काढावी. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही. पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल. तसेच एकाच पालकांनी 2 अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.