Earthquake Tremors In Jharkhand: झारखंड, रांची आणि जमशेदपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट

भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake Tremors In Jharkhand: झारखंड (Jharkhand) ची राजधानी रांचीसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) जाणवले. झारखंडची राजधानी रांची तसेच जमशेदपूर, चायबासा आणि खरसावन येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू झारखंडच्या खरसावन जिल्ह्यापासून 13 किलोमीटर अंतरावर होता.

शनिवारी सकाळी 9.20 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाटणा, बिहारमध्ये देखील भूकंपाचे परिणाम जाणवले. हे ठिकाणं भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 308 किमी उत्तरेस आहेत. (हेही वाचा -Delhi-NCR Earthquake Today: भारतासह पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के; दिल्ली-NCR हादरले)

अलीकडच्या काळात देश आणि जगाच्या अनेक भागात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पृथ्वीवर 7 टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत राहतात. तथापि, कधीकधी संघर्ष किंवा घर्षण होते. याच कारणामुळे पृथ्वीवर भूकंपाच्या घटना घडताना दिसतात. (हेही वाचा - Earthquake in Bay of Bengal: बंगालच्या उपसागरात भूकंप; 5.1 रिश्टर स्केलवर जाणवले हादरे)

भारतातील भूकंप झोन -

भूवैज्ञानिकांच्या मते, भारताच्या एकूण भूभागापैकी सुमारे 59 टक्के भूकंपासाठी संवेदनशील मानले जाते. शास्त्रज्ञांनी भारतातील भूकंप झोनचे झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 असे 4 भाग केले आहेत. झोन-5 मधील क्षेत्र सर्वात संवेदनशील मानले जातात, तर झोन-2 हे सर्वात कमी संवेदनशील मानले जातात. आपल्या देशाची राजधानी दिल्ली भूकंप झोन-4 मध्ये येते. येथे 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील होऊ शकतात, ज्यामुळे मोठा विध्वंस होऊ शकतो.



संबंधित बातम्या