DGCA Issues Notice To Air India: DGCA ची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस; उड्डाण विलंब आणि प्रवाशांच्या समस्यांवर व्यक्त केली नाराजी

यानंतर डीजीसीएने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

Air India (PC - Twitter)

DGCA Issues Notice To Air India: तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे विमान सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. आता नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जास्त विलंब आणि प्रवाशांची काळजी न घेतल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी 3.30 वाजता दिल्लीहून टेक ऑफ करणार होते. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणाला उशीर झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यानंतर शुक्रवारी दुपारचे फ्लाइटचे वेळापत्रक बदलण्यात आले. डीजीसीएने 30 मे रोजी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोच्या फ्लाइट AI 183 ला जास्त विलंब झाल्याबद्दल पहिली कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. याशिवाय 24 मे रोजी मुंबई ते सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एआय 179 विमानाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जास्त उशीर झाल्याबद्दल नोटीसही बजावण्यात आली आहे. (हेही वाचा -Bomb Threat Call Targeting Vistara Flight: दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बने उडवण्याची धमकी)

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एअर इंडियाच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि प्रवाशांना होणाऱ्या समस्यांची दखल घेतली. यानंतर डीजीसीएने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. (वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!)

एअर इंडियाकडून डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन -

एअर इंडियाच्या प्रवाशांना एअर कंडिशनिंगशिवाय विमानात बसवण्यात आले, त्यामुळे त्यांना कडक उन्हात त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाने डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवा नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची वारंवार गैरसोय होत होती. एअर इंडिया प्रवाशांची काळजी घेण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांशी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे फ्लाइट्सला उशीर झाला.