Delhi Yamuna Flood: दिल्लीतील पुरपरिस्थीती पाहता, दिल्ली सरकार सज्ज, सखल भागात शाळेला सुट्टी

त्यामुळे काही भागात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. नागरिकांना पुरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Delhi Flood Yamuna (Photo credit- ANI)

Delhi Yamuna Flood: देशात काही भागत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान देशाची राजधानी दिल्ली येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.  सर्वत्र पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी आता दिवसेंजदिवस वाढत चालली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 45 वर्षांने यमुना नदीच्या पाणी पातळी ही 208 मीटरचा टप्पा पार केला आहे. दिल्लीतील ही पूरस्थितीचा आढावा घेता सरकारने सतर्क झाले आहे. पुरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्यात आले आहे. दिल्ली सरकार याकडे योग्यरितीने निर्णय घेत आहे.

पुरस्थिती भागात बोटी तैनात 

 

दिल्लीतील पूरपरिस्थिती पाहता बोट क्लबच्या 17 बोटी आणि पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या 28 बोटी जनजागृती, बाहेर काढणे आणि बचाव कार्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. एकूण 45 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तर, सर्वाधिक पूरग्रस्त भागात बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 सखल भागातील अनेक शाळांना सुट्टी दिली 

दिल्लीची पुरस्थितीचा अभ्यास करता सरकाने शाळांना सुट्टी देण्याच्या आदेश दिला आहे. दिल्लीच्या शिक्षण विभागाने काही भागात शाळांना आज सुट्टी दिली आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकरिता ऑनलाईन पध्दतीने घतला जाईल असे सांगणात आले आहे.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी 

प्राधिकरणाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये यमुना नदीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पुरस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांनी विद्युत तारांपासून दूर राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक 1077 वर संपर्क साधावा, असे म्हटले आहे. अश्या काही व्यवस्थापन सरकार करत आहे.