Delhi Crime News: 16 वर्षाच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या,दिल्लीतील धक्कादायक घटना,गुन्हा दाखल

१६ वर्षाच्या मुलाची अज्ञात व्यक्तींनी भोसकून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गुरुवारी ही घटना दिल्लीतील अमन विहार परिसरात झाली.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Crime News:  दिल्लीत (Delhi) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा सुरक्षितेची भिती मनात निर्माण झाली आहे. दिल्लीत एका १६ वर्षाच्या मुलाची अज्ञात व्यक्तींनी भोसकून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गुरुवारी ही घटना दिल्लीतील अमन विहार परिसरात झाली. पोलिस ठाण्यात स्टेशनमध्ये चाकू मारल्याचा फोन आल्याने माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अमन विहार परिसरात एका १६ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सांयकाळी ७,४५च्या सुमारास हत्या झाली. पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. मुलगा जखमी बेशुध्द अवस्थेत होता.त्याच्या मानेवर आणि हातावर जखमा होत्या. पोलिसांनी त्याला संजय गांधी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिस अधिकाऱ्यांने माध्यमांना माहिती दिली की, मुलाचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दोषींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार करण्यात आली आहे आणि पोलिस पथके त्यांच्या शोध घेण्यासाठी सज्ज झाले आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहे. परिसरात या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement