Shraddha Murder Case: श्रद्धा वॉकर खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तयार केलं 3000 हून अधिक पानांचे आरोपपत्र

पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध 3 हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे.

Shraddha Murder Case (Photo Credit-Twitter/ ANI)

Shraddha Murder Case: श्रद्धा वॉकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करू शकतात. पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध 3 हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस कोणत्याही तारखेला आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते. सध्या कायदेतज्ज्ञ आरोपपत्राचा तपास करत आहेत. आफताबने गेल्या वर्षी 18 मे रोजी दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धाची गळा आवळून हत्या केली होती.

हत्येनंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. नंतर अनेक दिवस तो हे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकत राहिला. चार्जशीटमध्ये, पोलिसांनी 4 जानेवारी रोजी मेहरौलीच्या जंगलातून जप्त केलेल्या केस आणि हाडांच्या नमुन्यांच्या डीएनए अहवालाचा संदर्भ दिला आहे. ज्यात ही श्रद्धाची हाडे असल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा -Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी Aaftab ने श्रद्धाला केलं होतं रुग्णालयात दाखल; मुंबईतील डॉक्टरांचा खुलासा)

त्याचवेळी, श्रद्धाच्या डीएनए अहवालाव्यतिरिक्त, आरोपपत्रात आरोपी आफताब पूनावालाचा कबुलीजबाब आणि नार्को चाचणीच्या अहवालाचाही समावेश आहे. मात्र दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, या दोन्ही अहवालांना न्यायालयात फारसे महत्त्व नाही.

गेल्या वर्षी 18 मे रोजी आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीच्या छतरपूर भागात श्रद्धा वालकरची गळा आवळून हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून मेहरौली परिसरातील जंगलात फेकून दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीर कापण्यासाठी वापरलेले करवत आणि ब्लेड गुरुग्रामच्या एका भागात झुडपात फेकण्यात आले होते, तर मांस कापणारा चाकू दक्षिण दिल्लीतील एका डस्टबिनमध्ये फेकण्यात आला होता.