Delhi Police Suicide: राहत्या घरात एसीपीची गोळी झाडून आत्महत्या, दिल्लीत खळबळ

पत्नीच्या निधनानंतर एसीपीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Delhi Police Suicide: दिल्लीत एका खळबळजनक घटनेने शहर हादरलं आहे. दिल्ली पोलिस असलेले एसीपी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. अनिल सिसोदिया असं आत्महत्या करणाऱ्या पोलीसांचे नाव आहे. बुधवारी त्यांनी जंगपुरा येथील राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. अनिल सिसोदिया यांच्या पत्नीचा तीन दिवसांपुर्वी निधन झाल्याचे घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सांगितले. राहत्या घरात त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी पोलिसांना ही घटना सांगितली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.