Delhi News: फायर प्लेसच्या धुरात गुदमरून एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू, दिल्लीतील घटना
दिल्लीत एकाच फायर प्लेसच्या धुरामुळे गुदरमरून एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जणांची प्रकृती गंभीर झाली आहे.
Delhi News: दिल्लीत एकाच फायर प्लेसच्या धुरामुळे गुदरमरून एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. रात्रभर कडाक्याची थंडी असल्यामुळे घरात फायरप्लेस जळवण्यात आले होते. ही घटना दक्षिण दिल्लीतील असोला परिसरातील होती. पोलिसांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. फायरप्लेसचा धुरामुळे गुदरमरून मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.( हेही वाचा- मुंबई मध्ये अविघ्न पार्क इमारतीमध्ये पुन्हा आग; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज )
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीत कडाक्याची थंडी असल्याने घरात शेकोटी लावण्यात आली. फायरप्लेसच्या धुरामुळे गुदमरून तीन जणांची प्रकृती बिघाडली आणि दोघांचा मृत्यू झाला. घरात राहणारी अंजली आणि तिचा दोन वर्षाचा मुलगा शंभू याचा मृत्यू झाला. असोला पोलिसांनी या दोघांच्या मृत्यूची नोंद घेतली आहे. प्रकृती गंभीर असलेल्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अंजली आणि तिचा मुलगा शंभू यांना देखील रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
असोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापासून अंजली आणि तिचे कुटुंब असोला येथील भाड्याच्या घरात राहत होते. २७ जानेवारीच्या रात्री फायप्लेसचा वापर केला, फायरप्लेसमुळे अति धुरामुळे सर्व कुटुंब गुदरमले. सकाळी लक्षात आले की, खोलीत सर्व कुटुंबातील सदस्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही त्यामुळे पाचही जणांचा गंभीर त्रास होऊ लागला. पाचही जणांना तातडीने सपरदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांना मृत घोषित केले.