CBSE Board Exam 2020 च्या नॉर्थ ईस्ट भागातील परीक्षा रद्द; बोर्डाने कायमस्वरूपी उपाय सुचवावा - दिल्ली हायकोर्टाचे आदेश
दरम्यान हिंसक आंदोलनामुळे आज (26 फेब्रुवारी) 10,12 वी च्या सुमारे 86 परीक्षा केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मागील 2-3 दिवसांपासून ईशान्य दिल्ली मध्ये CAA Protest वरून अनेक ठिकाणी दंगल पेटल्या आहेत. दरम्यान हिंसक आंदोलनामुळे आज (26 फेब्रुवारी) 10,12 वी च्या सुमारे 86 परीक्षा केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना नवी तारीख सांगितली जाणार आहे. मात्र दिल्लीच्या इतर भागामध्ये नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. यावर आज दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीनुसार, न्यायालयाने याबाबत सीबीएसई बोर्डाने योग्य मार्ग काढावा असं म्हटलं आहे.
जस्टिस राजीव शकधर यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान मुलांच्या/ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबत खेळलं जाऊ शकत नाही. दरम्यान हाय कोर्टात विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी करण्यात आली होती. दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. CBSE Class 10th, 12th New Exam Pattern: शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 'सीबीएसई' च्या प्रश्नपत्रिका, गुणपद्धती आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांमध्ये बदल.
ईशान्य दिल्ली मध्ये 86 शाळांमधील परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत त्याची यादी सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आगामी परिक्षा तारखांबाबत नव्या तारखांबाबत cbse.nic.in वर माहिती दिली जाणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10 वी , 12 वी च्या परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत.