Delhi Crime News: दिल्लीत दरोड्यांचा पेट्रोलपंपवरच्या कर्मचाऱ्यावर हल्ला,पैसे लुटून फरार,आरोपींवर गुन्हा दाखल
दिल्लीतील मुंडका परिसरात बुधवारी सुमारे सहा दरोडेखोरांनी पेट्रोल पंप लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Delhi Crime News: दिल्लीतील मुंडका परिसरात बुधवारी सुमारे सहा दरोडेखोरांनी पेट्रोल पंप लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहा दरोडेखोरांनी पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून हजारो रुपयांची रोकड लुटून घटनास्थळावरून पळ काढल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी जवळपास दोन गोळ्या झाडल्या.
ही घटना मुंडका घेवरा मोड पेट्रोल पंपावर मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 1.30 च्या सुमारास घडली. सुमारे सहा मास्क घालून आलेले हल्लेखोर पेट्रोल पंपाजवळ आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यास सांगितले तर दुचाकीवर दुसऱ्या दरोडेखोराने पिशवीतून बंदूक काढून कर्मचाऱ्याकडे दाखवून त्याला सोबत नेले. त्याच्यासोबत आतून रोकड लुटली. किती रोकड लुटली गेली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
पेट्रोल पंपाचे कर्मचारी सुरक्षित असून, कर्मचाऱ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. डोक्यावर बंदुकीचा वार झालेला एक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांत या बाबत तक्रार दाखल करण्यात आले आहे.