Lockdown In India: दिल्लीतील आर्मी वेल्फेअर असोसिएशनकडून स्थलांतरित मजुरांसाठी 2500 फूड पॅकेट

ही पाकिटं आज दिल्ली कँटमधील सरकारी प्रतिनिधींना वाटपासाठी देण्यात येणार आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

आर्मीकडून स्थलांतरित मजुरांसाठी जेवण (PC - ANI)

Lockdown In India: दिल्लीतील आर्मी वेल्फेअर असोसिएशनकडून (Delhi Army Wives Welfare Association) स्थलांतरित मजुरांसाठी (Migrant Labourers) 2500 फूड पॅकेट तयार करण्यात आले आहेत. ही पाकिटं आज दिल्ली कँटमधील सरकारी प्रतिनिधींना वाटपासाठी देण्यात येणार आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अनेक मजुर अडकले आहेत. या मजुरांनी आप-आपल्या गावी धाव घेतली आहे. परंतु, त्यांना सध्या प्रचंड त्रासाला सामोर जाव लागत आहे. गेल्या आठवड्यापासून हाताला काम नसल्याने हे मजूर उपाशीपोटी पायपीट करत आहेत. अशा मजुरांसाठी देशातील विविध सामाजिक संस्था धावून येत आहेत. स्थलांतरित मजुराची मदत करण्यास लष्कर मागे राहिलेले नाही. या मजूरांसाठी देशातील विविध ठिकाणांहून मदतीचे हात पुढे येत आहेत. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 25 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या - अर्थमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे मागणी)

देशात तसेच राज्यातील पोलिस अधिकारीदेखील स्थलांतरित मजूरांना किराणा तसेच जेवण वाटप करत आहेत. सध्या देशातील विविध भागात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या मजुरांना एका महिन्यासाठी मोबाईल सेवा मोफत देण्यात यावी, यासाठी टेलिकॉम कंपन्यांना पत्र लिहलं होतं. तसेच रविवारी उत्तर प्रदेश येथे स्थलांतरीत कामगारांवर केमिकलयुक्त पाण्याची फवारणी केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी योगी सरकारचा निषेध व्यक्त केला होता.