Aguwani-Sultanganj Ganga Bridge: आठ वर्षाहून अधिक दिवस बांधलेल्या 'अगुवानी-सुलतानगंज गंगा पूला'चा मलबा 10 दिवसांत हटवण्यात येणार; मुंबईहून दाखल झाले तज्ज्ञांचे पथक
कोलकाता येथून 750 HP पोकलेन मशीन आणण्यात आले असून, त्याद्वारे दहा दिवसांत गंगा नदीतील मलबा हटवला जाईल, असे सांगण्यात आले आहे. बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करताना तज्ज्ञांच्या पथकाने तांत्रिक बाबीबाबतही गांभीर्याने चर्चा केली.
Aguwani-Sultanganj Ganga Bridge: भागलपूरमधील अगुवानी-सुलतानगंज गंगा पूल (Aguwani-Sultanganj Ganga Bridge) कोसळल्यानंतर आता गंगेतील ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने उद्ध्वस्त झालेल्या पुलाची पाहणी करून पुलावरील ढिगारा हटवण्याच्या कामाचा आढावा घेतला. मुंबईहून आलेल्या टीमने एसपी सिंगला कंपनीच्या (एसपी सिंगल कन्स्ट्रक्शन) बेस कॅम्पवर बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने पडलेल्या पुलाची छायाचित्रे टिपताना अनेक महत्त्वाची माहिती आणि ढिगारा हटवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेली माहिती घेतली.
कोलकाता येथून 750 HP पोकलेन मशीन आणण्यात आले असून, त्याद्वारे दहा दिवसांत गंगा नदीतील मलबा हटवला जाईल, असे सांगण्यात आले आहे. बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करताना तज्ज्ञांच्या पथकाने तांत्रिक बाबीबाबतही गांभीर्याने चर्चा केली. (हेही वाचा - Cyclone Biparjoy Update: येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ वेग पकडणार; कुठे होणार परिणाम? जाणून घ्या)
दरम्यान, 1710 कोटी खर्चून बांधलेला अगुवानी-सुलतानगंज गंगा पूल नितीश सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक होता. गेल्या आठ वर्षांपासून त्याचे बांधकाम सुरू होते. नितीश कुमार यांनी 2014 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती. 2019 मध्येच हा पूल तयार होणार होता. नंतर 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली.
तथापी, 4 जून रोजी, आगवाणी-सुलतानगंज महासेतूचा पायस क्रमांक 10, 11, 12 हा सुपर स्ट्रक्चरच्या तोरणांसह गंगेत पडला. एका अंदाजानुसार सुमारे 14 हजार टन मलबा गंगा नदीत पडला आहे. डेब्रिज हटवताना गंगेतील डॉल्फिनला इजा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)