West Bengal News: मतदान केंद्रावर लष्करी जवानाचा आढळला मृतदेह, पश्चिम बंगाल येथील घटना

ही घटना कूचबिहार येथील माथाभंगा येथील मतदान केंद्रावर घडली आहे. आज मतदान होत असल्याने अनेक ठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे.

Representational Image (File Photo)

West Bengal News: पश्चिम बंगालच्या एका मतदान केंद्रावर  लष्करी जवानाचा वॉशरुममध्ये घसरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना कूचबिहार येथील माथाभंगा येथील मतदान केंद्रावर घडली आहे. आज मतदान होत असल्याने अनेक ठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे. मतदान केंद्रावर मृतदेह आढळल्याने केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आज देशात ठिकठिकाणी मतदान सुरु झाले आहे. (हेही वाचा- जगातील सर्वात कमी उंचीची महिला Jyoti Amge ने बजावला नागपूर मध्ये मतदानाचा अधिकार)

अधिक माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील कुचबिहार येथील माथाभंगा मतदान केंद्रावर सुरु होण्यापूर्वी सीआरपीएफचे जवान बाथरुममध्ये निर्जीव अवस्थेत आढळून आले होते. केंद्रावरील इतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी पुढे सांगितले की, त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जवानाच्या मृत्यू नंतर हत्येचा संशय आला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण समजू शकेल. कूचबिहारमध्ये आज सकाळपासून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून लष्करी दलात एक शोक पसरला आहे.