Daljit Singh Chawdhary Appointed as DG BSF: दलजित सिंह यांच्याकडे बीएसएफ महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (BSF) महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सशस्त्र सीमा बल (SSB) महासंचालक दलजीत सिंह चौधरी यांच्याकडे सोपवला आहे.
Daljit Singh Chawdhary Appointed as DG BSF: केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (BSF) महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सशस्त्र सीमा बल (एसएसबी) महासंचालक दलजीत सिंह चौधरी (Daljit Singh Chawdhary)यांच्याकडे सोपवला आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल (Nitin Agarwal)आणि विशेष उप महासंचालक योगेश बहादूर (वाय. बी.) खुरानिया यांना पदावरून हटवल्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा निर्णय घेण्यात आला. नितीन अग्रवाल यांना कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच बीएसएफचे महासंचालकपद सोडण्याची वेळ आलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात वाढत्या दहशतवादी घटना पाहता केंद्र सरकारने कठोर पावले उचलत हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. (हेही वाचा: )
1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी दलजीत सिंह यांनी या वर्षी जानेवारीमध्ये एसएसबीचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारले. केंद्र सरकारने त्यांची 19 जानेवारीला एसएसबीच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. एसएसबीचे महासंचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची सीआरपीएफचे विशेष महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे आता बीएसएफचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नितीन अग्रवाल यांना केरळ केडर आणि योगेश बहादूर खुरानिया यांना ओडिशा केडरमध्ये परत पाठवले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने 30 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला आदेश जारी करण्यास सांगितले होते. त्यानंतर वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या संचालक साक्षी मित्तल यांनी हे आदेश जारी केले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. नितीन अग्रवाल हे केरळ केडरचे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार होता.
पोस्ट पहा
नितीन अग्रवाल, खुरानिया यांना हटवण्याचे कारण
जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आकडेवारीनुसार, या वर्षी 21 जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 24 चकमकी आणि 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 14 नागरिक आणि 14 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बांगलादेश सीमेवरील घुसखोरी हेही या निर्णयाचे कारण सांगितले जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)