Deoria Cylinder Blast: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे सिलिंडरचा स्फोट; महिलेसह 3 मुलांचा मृत्यू 

त्यांनी चहाचे पातेले ठेवून गॅस पेटवताच रेग्युलेटरने पेट घेतला. त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली.

Fire, Death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Deoria Cylinder Blast: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भलुआनी शहराजवळील डुमरी गावात (Dumri village) शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) होऊन एका महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की खोलीच्या छताला आणि भिंतीलाही तडे गेले.

आग आटोक्यात येईपर्यंत महिला आणि तिची तीन मुले पूर्णपणे जळून खाक झाली होती. ही महिला पतीसाठी चहा बनवण्यासाठी गेली होती. पती खोलीबाहेर होता, त्यामुळे तो वाचला. (हेही वाचा - Child Dies of Electric Shock in Bhiwandi: भिवंडीत 14 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू)

प्राप्त माहितीनुसार, डुमरी गावातील रहिवासी शिव शंकर गुप्ता यांच्या पत्नी आरती देवी (वय, 35) या शनिवारी सकाळी उठल्या. त्यांनी चहाचे पातेले ठेवून गॅस पेटवताच रेग्युलेटरने पेट घेतला. त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. आग घरातील दुसऱ्या खोलीपर्यंत पोहोचली, त्यामुळे खोलीत झोपलेली 14 वर्षीय आंचल, 12 वर्षीय कुंदन आणि 11 वर्षीय सृष्टी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. (हेही वाचा - Child dies of Electric Shock in Pune: वीजेचा धक्का बसून बालकामगाराचा मृत्यू, पुण्यातील घटना)

खोलीतच सर्वजण जळून मरण पावले. त्यांना बाहेर जाण्याची संधीही मिळाली नाही. अग्निशमन दलाच्या वाहनाने ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. पत्नी आणि तीन मुलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शिवशंकर बेशुद्ध झाला आहे.