Coronavirus: कोरोनामुळे देशात 41 जणांचा बळी; केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा आज पहाटे मृत्यू
आतापर्यंत देशात कोरोनामुळे 41 जणांचा बळी गेला आहे. आज पहाटे केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिरुवनंतपुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे मृत्रपिंड निकामी झाले होते. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
Coronavirus: कोरोना व्हायरने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 41 जणांचा बळी गेला आहे. आज पहाटे केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिरुवनंतपुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे मृत्रपिंड निकामी झाले होते. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
दरम्यान, सोमवारी तेलंगणामध्ये 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. या सहा जणांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर सरकारकडून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. या सहा जणांनी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती.( वाचा - Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, बुलढाणा येथे कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्र राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 225 वर)
सोमवारी देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आतापर्यंत देशात 1,251 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी देशात 227 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसची 5 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी मुंबईत 1, पुण्यात 2 आणि बुलढाण्यात 2 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.