Coronavirus: देशात कोरोनाचा 8 वा बळी, पश्चिम बंगालमध्ये 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
त्यामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 8 वर पोहचला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 2, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
Coronavirus: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 57 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 8 वर पोहचला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 2, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका 57 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आज कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. (हेही वाचा - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी दिलेल्या सुचना मोदी सरकारने का पाळल्या नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल)
दरम्यान, या रुग्णाने कोठेही प्रवास केला नव्हता. परंतु, 13 मार्च रोजी सर्दी, ताप आणि घसा खवखवत असल्यामुळे पीडित रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता. परंतु, त्यानंतर तीन दिवसांत या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. 19 मार्च रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि या रुग्णाचा मृत्यू झाला.