गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा, तर पर्रिकर यांच्या सरकारला बहुमत मिळणार नाही

गोवा (Goa) येथे काँग्रेस पक्षाने (Congress) शनिवारी राज्यपाल मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांना पत्र लिहून काँग्रेसचे सरकार बनणार असल्याचा दावा केला आहे.

गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (फोटो सौजन्य- IANS)

गोवा (Goa) येथे काँग्रेस पक्षाने (Congress) शनिवारी राज्यपाल मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांना पत्र लिहून काँग्रेसचे सरकार बनणार असल्याचा दावा केला आहे. तर भाजप (BJP) पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची बतावणी ही करण्यात आली आहे. काँग्रेस सरकार येण्यामागील मुख्य कारण म्हणजे राज्यात जास्त आमदरांची संख्या काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे आम्हाला गोव्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे.

राज्यपाल मृदुल सिन्हा यांना लिहिण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये विरोधी पक्ष नेता चंद्रकांत कवलेकर (Chandrakant Kavlekar) यांनी असे लिहिले आहे की, गोव्याती सरकारला बहुमत मिळणार नाही. तर काँग्रेस हा मोठा पक्ष असून या पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळायला पाहिजे. त्याचसोबत काँग्रेसने असे ही म्हटले आहे की, जर गोव्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तर ते अनधिकृत असणार आहे.

गोव्यात काँग्रेस पक्षाने गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात सुद्धा सरकार स्थापना करु असा दावा केला आहे.