Revanth Reddy Oath Ceremony: काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; सोनिया गांधींच्या उपस्थित पार पडला शपथग्रहण सोहळा
काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी उपस्थित होते.
Revanth Reddy Oath Ceremony: काँग्रेसच्या तेलंगणातील (Telangana) दणदणीत विजयानंतर आज एलबी स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची (Telangana New CM) शपथ घेतली. तर भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही उपस्थित लावली.
रेवंत रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनले. सुमारे दशकभरापूर्वी तेलंगणा नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विरोधी पक्षाचा दणदणीत पराभव केला. 119 सदस्यीय विधानसभेत पक्षाला 64 जागा मिळाल्या, तर बीआरएसला 39 जागांवर समाधान मानावे लागले. (हेही वाचा - Revanth Reddy is Next Telangana CM: रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री, 7 डिसेंबर रोजी घेणार शपथ, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी)
दरम्यान, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदराजन यांनी रेवंत रेड्डी आणि इतर मंत्र्यांना शपथ दिली. शपथविधीपूर्वी एलबी स्टेडियमबाहेर लोककलाकारांनी कार्यक्रमही केले. रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित होण्यापूर्वी, तेलंगणामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पूर्व तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख एन. उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांसारख्या नावांचा समावेश आहे. (हेही वाचा -Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video))
रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या तेलंगणाच्या नव्या सरकारमध्ये पहिल्यांदाच हैदराबादचा प्रतिनिधी असणार नाही. वास्तविक, हैदराबाद अंतर्गत विधानसभेच्या 15 जागा आहेत आणि त्यापैकी एकही जागा काँग्रेसने जिंकलेली नाही. हैदराबादमध्ये BRS, AIMIM आणि भाजपने 15 जागा जिंकल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)