Unlock 5: केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर; 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह, मल्टिप्लेक्स उघडण्याची परवानगी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकींसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत.
Govt Of India Issues New Guidelines For Re-Opening Cinemas, Multiplexes: कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतासह संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकींसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात मिशन अनलॉकच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) नवी गाईडलाईन्स जाहीर केली आहे. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्सला उघडण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय मनोरंजन पार्क उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, अनलॉक 5च्या अंतर्गत देशात येत्या 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्सला उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील शाळा आणि कोचिंग संस्था उघडण्याबाबत राज्य सरकारला 15 ऑक्टोबरनंतर निर्णय घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र, यासाठी परिवाराची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे.महाराष्ट्रात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, राज्यात येत्या 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्ट्रारंट, फूड कोर्ट आणि बार 50 टक्के ग्राहकांसह उघडता येणार आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी
एएनआयचे ट्विट-
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 62 लाख 25 हजार 764 वर पोहचली आहे. यापैकी 97 हजार 497 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 51 लाख 87 हजार 826 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 94 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु आहे.