Coronavirus: दिल्लीतील CISF च्या कर्मचार्यांकडून एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडमध्ये जमा
सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन (Rajesh Ranjan) यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांना 16,23,82,357 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
दिल्लीतील सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (Central Industrial Security Force CISF) च्या कर्मचार्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडामध्ये (PM Cares Fund) स्वइच्छेने दान केला आहे. सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन (Rajesh Ranjan) यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांना 16,23,82,357 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या विषाणुविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आर्थित मदत करण्याचे आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला देशातील दिग्गज कलाकार, उद्योजक, नेत तसेच सामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा - Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर)
दरम्यान, अनेक संस्थांतील कर्मचाऱ्यांनी आपला एका महिन्याचा पगार पीएम केअर फंडला दान केला आहे. मागील महिन्यात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला पगार पंतप्रधान केअर फंडला दिला होता. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत 42 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.