Cyber Crime: स्पॅम कॉल आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 52 लाख सिम बंद

त्यामुळे सिम कार्ड घेणाऱ्या डिलर्सला सतर्क राहावे लागणार आहे

Sim Card BLOCK PC PIXABAY

Cyber Crime: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर फसवणूकला आळा घालण्यासाठी केंद्र सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिम कार्ड घेणाऱ्या डिलर्सला सतर्क राहावे लागणार आहे. सरकारने दिलेल्या नियमावलीत सिम कार्ड डीलर्ससाठी बायोमेट्रीक आणि पोलिस पडताळणी आवश्यक असणार आहे.  (हेही वाचा- येत्या 1 जूनपासून लागू होणार ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम; आता टेस्ट देण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही)

स्पॅम कॉल आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिम कार्ड बंद केले जातील, अशी माहिती दूर संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, ''आम्ही ५२ लाख फसवे कनेक्शन शोधून काढले आहे आणि ते निष्क्रीय केले आहे. ६७,०००  सिम कार्ड डीलर्संला ब्लॅकलिस्ट केले आहे. ३०० एफआयआर नोंदवले गेले आणि १७,००० मोबाईल हॅंटसेट ब्लॉक केले आहे''

सिम बॉक्सद्वारे अनेक अॅटोमेटीक कॉल केले जाऊ शकतात. फसवणूक करणारा व्यक्ती मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करून फसणूकीचे कॉल करत असतात. यावर तपशीलवर अभ्यास केल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला आहे की, बल्क कनेक्शन लवकरच बंद केली जाईल आणि व्यवसायिक कनेक्शनसाठी एक प्रणाली तयार केली जाईल, असे दुरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

व्यवासायिक कनेक्शनसाठी वैयक्तिक केवायसी अनिवार्य केले जाईल. म्हणजेच कंपनीने ४०० सिम कार्ड घेतले तर प्रत्येक सिमसाठी केवायसी करणे गरजेचे आहे असं त्या पुढे म्हणाल्या. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डीलर्सला १० लाखांचा दंड आकारला जाईल. १० लाख डीलर्स आहेत त्यांना पोलिस पडताळणीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल असा दावा दुरसंचार मंत्री यांनी केला.

केंद्रीय मंत्री यांनी सांगितले की, ६६,००० व्हॉटअॅप खाती देखील ब्लॉक करण्यात आली आहेत.Truecaller नुसार, भारतातील मोबाईल फोन वापरकर्त्यांना दरमाही सरासरी १७ स्पॅम कॉल येतात. युजर्सच्या माहितींची सुरक्षतेसाठी आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी बल्क सिम कार्डवर हे निर्णय घेतले आहे.