Guidelines for International Arrivals: केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केले मार्गदर्शक तत्वे; 24 डिसेंबरपासून प्रवाशांची कोविड रॅन्डम चाचणी घेण्यात येणार

काही आठवडे परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेतला जाईल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

Guidelines for International Arrivals: चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची (Coronavirus) वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने (Central Government) कारवाई केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रवासाच्या ७२ तास आधी केलेल्या RT-PCR चाचणीची माहिती भरण्याशी संबंधित हवाई सुविधा फॉर्म पुन्हा अनिवार्य करण्याची तयारी करत आहे. हे नियम चीन आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना लागू होतील. फॉर्ममध्ये कोरोना चाचणी अहवालासोबत संपूर्ण लसीकरण पुराव्याची माहितीही भरावी लागणार आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines for International Arrivals) जारी केली आहेत.

दरम्यान, 24 डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या काही प्रवाशांसाठी कोविडची यादृच्छिक चाचणी केली जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक फ्लाइटमधील प्रवाशांची यादृच्छिकपणे संबंधित एअरलाइन्सद्वारे कोविड चाचणीसाठी निवड केली जाईल. फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी 2% प्रवाशांनी आगमनानंतर विमानतळावर कोविड चाचणी करणे सुनिश्चित केले जाईल. अशा प्रवाशांची एअरलाइनद्वारे ओळख पटवली जाईल. नमुना दिल्यानंतर प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. पॉझिटिव्ह आलेले नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील. (हेही वाचा - PM Narendra Modi on Covid19: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा; मास्क, चाचणी आणि Precaution Dose वर दिला जाणार भर)

वास्तविक, चीन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता देशातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर, सूत्रांनी सांगितले की, जगातील काही भागांमध्ये अलीकडेच प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे, चीन आणि इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर यादृच्छिक तपासणी केली जाईल.

आता चीन आणि इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाच्या ७२ तास अगोदर केलेल्या RT-PCR चाचणीचा तपशील किंवा संपूर्ण लसीकरणाचा पुरावा देण्यासाठी आरोग्य मंत्रालय हवाई सुविधा फॉर्म पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. काही आठवडे परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेतला जाईल. (हेही वाचा - COVID-19 Outbreak in China: चायनामुळे वाढले जगाचे टेन्शन; प्रतिदिन 5,000 पेक्षाही अधिक मृतांची बींजिगला नोंद- रिपोर्ट)

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्यास आणि दक्षता वाढविण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांची यादृच्छिक RTPCR तपासणी सुरू केली आहे. आम्ही साथीच्या रोगाचा सामना करण्याचा निर्धार केला आहे आणि योग्य पावले उचलत आहोत.