Begging Ban In Indore: 1 जानेवारीपासून भिकाऱ्यांना पैसे दिल्यास तुरुंगात जाल; इंदूरमध्ये नव्या वर्षी नवा कायदा

भिक्षा म्हणून पैसे देण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एफआयआर नोंदवून पैसे देण्याला थेट तुरुंगात टाकण्यात येणार आहे.

Photo Credit- Pixabay

Begging Ban In Indore: इंदूरला भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने (Indore administration)प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच भीक मागण्यास बंदी(Indore beggars) घातली होती. ही मोहीम 10 शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रशासनानेही काही धक्कादायक खुलासे केले आहेत. भिकाऱ्यांना सहा महिने निवारा आणि काम मिळण्यासाठी एक संस्था मदत करेल. मात्र आता, 1 जानेवारीपासून भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात येणार आहे.

भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे इंदूर आता भिकारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. 1 जानेवारीपासून भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्या म्हणण्यानुसार, इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (हेही वाचा:The Eight Great Powers of 2025: जगातील 8 शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला मिळाले 5 वे स्थान; ब्रिटन, फ्रान्सला टाकले मागे, See List)

भिकाऱ्यांविरोधात जनजागृती मोहीम महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. कोणी भीक मागताना आढळल्यास त्याच्याविरुद्धही एफआयआर नोंदवला जाईल. भिकाऱ्यांना पैसे देऊन या पापात सहभागी होऊ नका, असे आवाहन त्यांनी इंदूरमधील सर्व रहिवाशांना केले.(हेही वाचा:Who Is Preeti Lobana: कोण आहेत प्रीती लोबाना? कोणाला करण्यात आले गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर, जाणून घ्या संपूर्ण माहिती)

भिकारी हा व्यवसाय बनवला

इंदूरमध्ये एकदा एका भिकाऱ्याकडून 29 हजार रुपये आढळले. भिकारी पैसे उधार देतात आणि व्याज घेतात अशी प्रकरणे समोर आली आहेत. भीक मागण्यासाठी राजस्थानमधून मुलांना घेऊन एक टोळी येथे आली होती अशी माहितीदेखील समोर आली आहे.

मध्य प्रदेशचे समाजकल्याण मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी सांगितले की, इंदूरमधील एका संस्था या प्रयत्नात सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. ही संस्था त्यांना सहा महिने निवारा देईल आणि त्यांच्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न करेल. हा एक स्तुत्य उपक्रम आहे.