Delhi Bride Dies While Dancing: 'मेंहदी है रचने वाली' स्टेजवर डान्स करत असताना नववधूचा मृत्यू, नैनिताल येथील हृदयद्रावक घटना
शनिवारी डेस्टिनेशन वेंडिगसाठी आलेल्या वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नैनिताल येथील रिसॉर्टमध्ये मेंहदीचा कार्यक्रम सुरु असताना वधू अचानक कोसळली.
Delhi Bride Dies While Dancing: नैनितालमध्ये लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. शनिवारी डेस्टिनेशन वेंडिगसाठी आलेल्या वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नैनिताल येथील रिसॉर्टमध्ये मेंहदीचा कार्यक्रम सुरु असताना वधू अचानक कोसळली. मित्र मैत्रिणींसोबत डान्स करत असताना, वधू स्टेज बेशुध्द पडली. वधू बेशुध्द पडल्याने पाहुणे मंडळी घाबरले तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा- रिल्ससाठी पुण्यातील तरुणीची खतरनाक स्टंटबाजी, Video पाहून नेटकरी संतापले)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रहिवासी असलेली 28 वर्षीय श्रेया जैन हिचं लग्नाच्या कार्यक्रमापूर्वीच मृत्यूने कवटाळले आहे. श्रेया आणि तिचा होणारं सासर लग्नासाठी भीमताल येथील नौकुचियाताल जवळील एता रिसॉर्टमध्ये आले. शनिवारी तिचा मेंहदीचा कार्यक्रम होता. मेंहदीच्या कार्यक्रमासाठी ती सजून धजून स्टेजवर आली. स्टेजवर मित्र परिवारासह डान्स करत असताना अचानक ती बेशुध्द पडली.
तीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु होताच डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. ह्रदयविकाराचा झटक्याने तीचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर कुटुंबावर मोठा दुखांचा डोंगर कोसळला आहे. रविवारी श्रेयाचं लग्न होणार होते. पण लग्नाच्या एक दिवस आधीच तीचा मृत्यू झाला. श्रेया लखनऊ येथील आयटी कंपनीत कामाला होती. जैन कुटुंबाने पुढील कायदेशीर कारवाई न करण्याचे पोलिसांना विनंती केली आहे. रविवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.