IPL Auction 2025 Live

NSA अजित डोवाल यांच्या सुरक्षेत भंग, अज्ञात व्यक्तीने केला कार घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. आता स्थानिक पोलीस आणि विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहेत.

NSA Ajit Doval (फोटो सौजन्य- PTI)

दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या अधिकृत निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, सुरक्षा दलांनी त्या व्यक्तीला थांबवले आणि ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एक अज्ञात व्यक्ती एनएसए अजित डोवाल यांच्या घरात वाहन घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. आता स्थानिक पोलीस आणि विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहेत. तो भाड्याची गाडी घेऊन आला होता, प्राथमिक तपासात तो मनोरुग्ण असल्याचं म्हटलं जात आहे. (वाचा - PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली)

तो चुकून घरात घुसला की त्यामागे काही षडयंत्र आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे. उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे जन्मलेले एनएसए अजित डोवाल हे मोदी सरकारमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. अजित डोवाल हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 2005 मध्ये, डोवाल इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे संचालक म्हणून निवृत्त झाले. डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. डोवाल यांना भारताचे जेम्स बाँड म्हणूनही ओळखले जाते.