Rajastan News: रेल्वे रुळावर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, राजस्थान येथील घटना, पोलिसांकडून तपास सुरु

राजस्थान येथील कोटा शहरातील उद्योग नगर पोलिस स्टेशन हद्दीतील डीसीएम पुलियाजवळील रेल्वे रुळांवर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Photo Credit: X

Rajastan News: राजस्थान येथील कोटा शहरातील उद्योग नगर पोलिस स्टेशन हद्दीतील डीसीएम पुलियाजवळील रेल्वे रुळांवर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला. (हेही वाचा- नवी मुंबईमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून गरोदर महिला, पती आणि मुलाचा खून)

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा येथील रेल्वे रुळावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी शोध सुरु केला. तरुणाचे डोके रेल्वेच्या खाली चिरडले गेले. धड आणि शरिर वेगळे झाले.

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशातून आधारकार्ड सापडले. ज्यातून त्याची ओळख समोर आली आहे.अजय महावर असं तरुणाचे नाव आहे. तो कोटा जिल्ह्यातील करवाड येथील रहिवासी आहे. तो 23 वर्षीय बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत होता अशी ओळख विद्यार्थ्याची पटली.

डीएसपी योगेश शर्मा यांनी सांगितले की, अजय महावरच्या पालकांनी त्यांच्या ओळखीची पुष्टी केली. महावर यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की ते शनिवारी सकाळी कोटा येथील त्यांच्या महाविद्यालयासाठी घरातून निघाले आणि ते त्यांच्या गावी परतले नाहीत. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही त्यामुळे हे आत्महत्या प्रकरण नसल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.  शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, असे डीएसपींनी सांगितले

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement