Uttar Pradesh Crime: गौतम बुध्द विद्यापीठाच्या वसतिगृहातील पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह, पती आणि सासू फरार, गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुध्द विद्यापीठाच्या स्टाप क्वार्टरच्या छतावरील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Representational Image (File Photo)

Uttar Pradesh Crime:  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुध्द विद्यापीठाच्या स्टाप क्वार्टरच्या छतावरील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष  म्हणजे महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर तीचा पती आणि सासू फरार आहे. मृत महिलेचा पती गौतम बुध्द नगर विद्यापीठात चतुर्थ श्रेणीत कर्मचारी असून त्याला वसतिमृहातच क्वार्टर खोली देण्यात आली होती.(हेही वाचा- प्रसिध्द अभिनेत्री कनकलथा काळाच्या पडद्याआड)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली होती. पोलिसांना चौकशीतून असं दिसून आले की, मृताचा पती आणि सासू घटनास्थळावरून फरार आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली. सासरची मंडळी फरार असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय होताच.

पोलिसांनी घटनास्थळावर चौकशी सुरु केली. तेव्हा शेजारच्यांकडून असं समजले की, रात्री पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होते. मृत महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती पत्नी आपआपसांत रोज भांडण करत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेची हत्या का केली हे देखील अद्याप अस्पष्ट आहे.