Ayodhya Boat Tragedy: सरयू नदीत यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटली, एक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
या घटनेनंतर एक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक आणि एसडीआरएफच्या जवांनांनी ८ यात्रेकरूंची सुटका केली.
Ayodhya Boat Tragedy: अयोध्येतील सरयू नदीत 9 यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना घडली. या घटनेनंतर एक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक आणि एसडीआरएफच्या जवांनांनी 8 यात्रेकरूंची सुटका केली. तर या बोटमध्ये प्रवास करणारी एक महिला बेपत्ता झाली आहे. महिलेचे नाव कशिश आहे. (हेही वाचा- दिल्लीतील जहांगीरपुरी येथे इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, ९ यात्रेकरांना घेऊन जाणारी बोट सरयू नदीत उलटली. नदीत बोट उलटल्यानंतर, घटनेची माहिती बचावकार्याला देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. स्थानिकांच्या आणि एसडीआरएफच्या जवांनांनी जवांनी ८ यात्रेकरूंना बाहेर काढले. परंतु या बोटमध्ये एक महिला प्रवास करत होती. बोट उलटल्याने ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.
महिला बेपत्ता असल्याची माहिती बचावकार्याला देण्यात आली. महिलेचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरु झाले. परंतु अद्याप तीच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. अयोध्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना माध्यमांना सांगितले की, दोन बोटींची एकमेकांना टक्कर झाली. त्यामुळे बोट उलटली. बोटीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातले होते. लाइफ जॅकेट असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. बेपत्ता झालेल्या महिलेने देखील लाईफ जॅकेट परिधान केले होते. बचाव पथक तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे.