Building Collapses in Jahangirpuri: दिल्लीतील जहांगीरपुरी येथे इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन दलाला दुपारी 12:51 वाजता एक आपत्कालीन कॉल आला. ज्यानंतर पाच अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले.

Building Collapses in Jahangirpuri: दिल्लीतील जहांगीरपुरी येथे इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती (Watch Video)
Building Collapses in Jahangirpuri (PC - ANI)

Building Collapses in Jahangirpuri: उत्तर-पश्चिम दिल्लीच्या जहांगीरपुरी (Jahangirpuri) भागात शुक्रवारी दुपारी दोन मजली इमारतीचा एक भाग कोसळला (Building Collapses). या अपघातात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने (DFS) सांगितले की, आतापर्यंत एका महिलेसह तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी आणखी लोक अजूनही अडकल्याचे सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन दलाला दुपारी 12:51 वाजता एक आपत्कालीन कॉल आला. ज्यानंतर पाच अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथकेही तयार करण्यात आली आहेत. (हेही वाचा -Jharkhand Building Collapse: झारखंडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीत, बचावकार्य सुरु)

पहा व्हिडिओ -

सध्या घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. अधिकारी या घटनेत अडकलेल्यांची सुरक्षा आणि पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक काम करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).