भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनिया गांधींना 'राजीव गांधी फाऊंडेशन'च्या मुद्द्यावरून विचारले 10 प्रश्न; जाणून घ्या काय म्हणाले

'कोरोनाचे संकट आणि भारत-चीन तणावाच्या मुद्द्यांवरून सोनिया गांधीं यांनी लपण्याचा प्रयत्न करु नये, अशी टिकाही जे.पी नड्डा यांनी केली आहे. भारताचे सैनिक देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सुरक्षित आहे, असा विश्वासही यावेळी जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केली आहे.

JP Nadda (Photo Credits: IANS)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (JP Nadda) यांनी आज राजीव गांधी फाऊंडेशनच्या (Rajiv Gandhi Foundation) मुद्द्यावरुन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना (Sonia Gandhi) 10 सवाल केले. 'कोरोनाचे संकट आणि भारत-चीन तणावाच्या मुद्द्यांवरून सोनिया गांधीं यांनी लपण्याचा प्रयत्न करु नये, अशी टिकाही जे.पी नड्डा यांनी केली आहे. भारताचे सैनिक देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सुरक्षित आहे, असा विश्वासही यावेळी जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी नड्डा यांनी सोनिया गांधी यांना 2005-2009 या काळात चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे कसे मिळाले? काँग्रेसचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाशी संबंध कसे? 2005-2008 पंतप्रधान मदत निधीचा पैसा आरजीएफमध्ये का वळवला? असे अनेक प्रश्न विचारले. (हेही वाचा - India-China Border Tensions: भारत-चीन तणावाप्रकरणी शरद पवार म्हणाले- 1962 मधील घटना लक्षात ठेवा; राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकरण योग्य नाही)

जे.पी नड्डा यांनी काँग्रेसला विचारलेले 10 प्रश्न -

RCEP भाग बनण्याची काय गरज होती? काँग्रेस सरकारच्या काळात चीनसोबतचा व्यवहार 1.1 बिलियन अमेरीकी डॉलर वाढवून 36.2 बिलियन अमेरीकी डॉलर कसा झाला?

काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये कुठले संबंध आहेत? स्वाक्षरी केलेले तसेच स्वाक्षरी न केलेले काही MOU हा नेमका प्रकार काय?

या फाऊंडेशनद्वारे कॉर्पोरेट संस्थाना मोठ्या प्रमाणात डोनेशनच्या स्वरुपात पैसा देण्यात आला. त्या बदल्यात त्यांनाच का कंत्राट दिले गेले?

मेहुल चोकसीने राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे पैसे का घेतले? मेहुल चोकसीला कर्ज का दिले? राजीव गांधी फाऊंडेशनचा मेहुल चोकसीशी काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देशाला हवी आहेत.

यूपीए सरकारने अनेक केंद्रीय मंत्रालय, सेल, गेल, एसबीआय यासारख्या इतर संस्थांना राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे देण्यास दबाव का टाकण्यात आला? खासगी संस्थांना पैसे भरण्यासाठी असा प्रकारे दबावतंत्र का करण्यात आले? यामागे नेमकं कारण काय?

पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीचा वापर लोकांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी वापरला जातो. मात्र 2005-08 या काळात ते पैसे राजीव गांधी फाऊंडेशनसाठी का दिले?

राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावाने कोट्यावधींची जमीन नियमित भाडेत्त्वावर कशी दिली? राजीव गांधी फाऊंडेशनच्या खात्यात सीएजी ऑडिटिंगला का विरोध करत आहेत? पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीचे ऑडिटर कोण होते?