भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्य, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
पी नड्डा (J.P Nadda) यांची आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P Nadda) यांची आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (National President of Bharatiya Janata Party) बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी दिग्गज नेत्यांनी जे. पी नड्डा यांना शुभेच्छा दिला आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जे. पी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - जे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शुभेच्छा देताना जे. पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जे. पी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जे.पी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही जे. पी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बिहारमध्ये जन्मलेले जे. पी. नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोठा वाटा आहे. 2 डिसेंबर 1960 मध्ये जे. पी नड्डा यांचा पाटणामध्ये जन्म झाला. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. हिमाचल प्रदेशमधून त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. 1993 मध्ये नड्डा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडणून आले.