BJP Leader Monu Kalyane Shot Dead: इंदूरमध्ये भाजप नेते मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या

घटनेनंतर मोनूला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

BJP Leader Monu Kalyane (PC - X?@MPfirstofficial)

BJP Leader Monu Kalyane Shot Dead: इंदूरमध्ये भाजप नेते मोनू कल्याणे (BJP Leader Monu Kalyane) यांची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. मोनू मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले जाते. मोनूच्या हत्येनंतर विजयवर्गीय यांचा मुलगा, माजी आमदार आकाश आपल्या समर्थकांसह मोनूच्या घरी पोहोचले. मोनू हे भाजप युवा मोर्चात शहर उपाध्यक्षपदावर होते.

प्राप्त माहितीनुसार, एमजी रोड परिसरातील चिमणबाग चौकात ही घटना घडली. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री तीनच्या सुमारास मोनूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि भाजपचे अनेक नेते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. यामध्ये आरोपी पियुष आणि अर्जुनची नावे समोर येत आहेत. त्या आधारे रात्री उशिरापासून अनेक ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला. हे प्रकरण परस्पर वादाचे असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा -VIDEO: तब्बल 15 कुत्र्यांनी चढवला हल्ला, महिलेने वाचवले स्वत:चे प्राण, भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

आरोपींनी मोनू यांच्यावर एकापेक्षा जास्त वेळा गोळीबार केला होता. घटनेनंतर मोनूला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मोनूशी वैर होते. मोनू हा उषा फाटक येथील रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार आकाश विजयवर्गीय आणि भाजपचे इतर नेते रात्रीच मोनू यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचले. (हेही वाचा -JD(S) Leader Suraj Revanna Arrested: जेडी (एस) नेते सूरज रेवन्ना यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक)

मोनू कल्याणे दरवर्षी परिसरात भगवा यात्रा काढत असे. शनिवारी रात्री तो याचीच तयारी करत होता. तेवढ्यात पियुष आणि अर्जुन दुचाकीवरून तेथे पोहोचले. संभाषणात त्याने मोनूला विचारले की, रॅलीची वेळ काय आहे. तुला किती पोरं आणायची आहेत? यानंतर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तूल काढून मोनूवर दोन गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने मोनू जागीच पडला. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. आरोपीने जवळच उभ्या असलेल्या मित्रांवरही हवेत गोळी झाडली. मात्र, मोनूचा मित्र थोडक्यात बचावले.