Bihar Bridge Collapse: बिहार मधील किशनगंज परिसरातील पूल कोसळला; पहिल्या पावसामुळे बांधकामादरम्यान पूल कोसळला

पहिल्याच पावसामुळे पूल कोसळला आहे. लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. बिहारमध्ये पूल कोसळल्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

bridge collapse- Representative Image (Pixabay)

Bihar Bridge Collapse: बिहारमध्ये आणखी एक पुल पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राष्ट्रीय महामार्गावरील  क्रंमाक 327 ई वरील ठाकुगंज ते बहादूरगंज दरम्यान मेची नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाया अचानक खाली कोसळला आहे. ह्या घटनेमुळे किशनगंड सिलिगुडी अररिया मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गौरी चौकात हा पुल बांधण्यात येत आहे हा पुल पहिल्याच पावसातच कोसळला आहे. याचदरम्यान ह्यांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

ह्या पुलाचे बांधाकाम GR इन्फ्रास्ट्रचर यांच्या हाती होते. 1500 कोटी खर्च करत हा पुल बांधण्यात येत होता. अररिया - किशनगंज- सिलिगुडी ह्या शहरांना जोडणारा हा पूल बांधण्यात येत होता. पूल कोसळ्याने लोकांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. किशनगंजमधील गलगलिया ते अररिया दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असल्याची माहिती आहे

अररिया-गलगलिया चौपदरी रस्ता, जो सामजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे,.तो 94 किमी लांबीचा आहे. त्याच्या बांधकामासाठी 1546 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हा रस्ता दोन पॅकेजमध्ये बांधण्यात येत आहे. पहिल्या पॅकेजमध्ये गलगलिया ते बहादूरगंज दरम्यान 49 किमी लांबीचा रस्ता आहे. त्याच्या बांधकामाचा नागरी खर्च 599 कोटी आहे, तर या प्रकल्पासाठी एकूण 766 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. दुसरीकडे, दुसऱ्या पॅकेजमध्ये बहादूरगंज ते अररिया दरम्यान बांधण्यात येणाऱ्या 45 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचा नागरी खर्च 598 कोटी आहे. यासाठी एकूण 780 कोटी 32 लाख इतका खर्च येणार आहे.

दरम्यान 1700 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला पूल गंगा नदीत बुडाला आहे. येथेही पुलाचा पहिला एक फूट सुमारे 3 ते 4 फुटांपर्यंत बुडाला आणि त्यानंतर तीन फुटांवर विसावलेले ३० स्लॅब नदीत बुडाले.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif