Bharat Ratna 2019: प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देखमुख यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला आहे
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना आज (8 ऑगस्ट) 'भारत रत्न' (Bharat Ratna) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला आहे. प्रणब मुखर्जी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील नेता आणि समाजसेवी नानाजी देखमुख (Nanaji Deshmukh) यांच्यासह प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांनासुद्धा भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र भूपेन हजारिका यांचा पुरस्कार त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी स्विकारला. तर नानाजी देशमुख यांचा पुरस्कार दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांनी स्विकारला आहे.
यंदाचे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी:
-प्रणब मुखर्जी
प्रणब मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात ते 1969 पासून सक्रिय आहेत. मुखर्जी यांनी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.
-नानजी देशमुख
नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. पुणे विद्यापीठाने त्यांचा गौरव ’डॉक्टर ऑफ लेटर्स’या पदवीने केला आहे. फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता भारतरत्न या मरणोत्तर पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.
-भूपेन हजारिका
डॉ. भूपेन हजारिका हे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते. आसामी प्रमाणेच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ भारत रत्न जाहीर करण्यात आला आहे.
1955 नंतर भारतामध्ये मरणोत्तर भारत रत्न देण्याची प्रथा सुरू झाली आहे. भूपेन हजारिकाच्या कुटुंबियांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिल्याने चर्चा रंगल्या होत्या.