Bhagirathi Amma: केरळमधील 107 वर्षीय भागिरथी अम्मा यांचे निधन, वयाच्या 105 व्या वर्षी दिली होती इयत्ता 4थी ची परीक्षा
107 वर्षीय कोल्लमच्या (Kollam) मूळ रहिवाशांनी नारी शक्ती पुरस्कार (Nari Shakti Puraskar) जिंकला होता.
दोन वर्षांपूर्वी वयाच्या 105 व्या वर्षी साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या केरळमधील (Kerala) सर्वात वयस्कर अभ्यासिका भागिरथी अम्मा (Bhagirathi Amma) यांचे गुरुवारी निधन झाले आहे. साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण करून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या भागिरथी अम्मांचे गुरुवारी उशिरा वयाच्या 107 व्या वर्षी निधन झाले आहे. 107 वर्षीय कोल्लमच्या (Kollam) मूळ रहिवाशांनी नारी शक्ती पुरस्कार (Nari Shakti Puraskar) जिंकला होता. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने काम करणाऱ्यांना मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) त्यांना सन्मानित केले होते. त्यांची कहाणी माध्यमांतून सर्वत्र प्रसिद्ध झाली होती . पंतप्रधान नरेंद्र मोदी (Minister Narendra Modi) यांनीही आपल्या 'मन की बात' (Man Ki Baat) कार्यक्रमाच्या एपिसोड दरम्यान त्यांच्याबद्दल बोलले होते.
मूळचे कोल्लमच्या प्रक्कुलम येथील रहिवासी भगिरथी अम्मा यांनी केरळ राज्य साक्षरता मिशनद्वारे घेण्यात आलेल्या लेव्हल सेव्हन परीक्षांचे वर्ग सुरू केले होते. दहावीच्या परीक्षा पूर्ण करण्याचे स्वप्न मागे ठेवून त्या निघून गेल्या. भगीरथी अम्मा या देशातील सर्वात वयस्कर विद्यार्थी असल्याचे समजते आहेत. भगीरथी चौथीमध्ये गणितामध्ये १००% गुण मिळवले. नुकतीच त्यांनी आपल्या डिजिटल इयत्तेच्या परीक्षेची तयारी डिजिटल क्लासेसच्या माध्यमातून करण्यास सुरूवात केली होती. गेल्या एक महिन्यापासून भागिरथी अम्मा खूपच अशक्त झाल्या होत्या. त्यामुळे सातत्याने त्यांच्या तब्येतीत बिघाड होत होता. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “प्रथम नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांपैकी एक, श्रीमती भगीरथी अम्मा, ज्यांना अक्षरा मुठाशी किंवा साक्षरता आजी म्हणून ओळखल्या जायच्या. यांचे केरळमधील कोल्लम येथे निधन झाले. ती लाखो लोकांना प्रेरणा देणारी होती. ओम शांतीही!
गेल्या वर्षी 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भागिरथी अम्मा यांचे कौतुक केले होते. त्यांच्यासारखे लोक हे देशाचे प्रेरणास्थान आणि शक्ती आहेत. भगीरथी अम्मा यांनी लहान वयातच आई गमावली आणि नंतर त्यांचा नवरा देखील याचा उल्लेख करून, मोदींनी भगीरथी अम्मा यांनी शिक्षण सुरू ठेवल्याबद्दल दाखविलेल्या उत्साहाचे कौतुक केले. वृत्तानुसार, भगीरथी अम्मा यांचे अंत्यसंस्कार कोल्लम येथे राज्य सन्मानार्थ करण्यात येणार होते. भागीरथी अम्मा यांना 12 नातवंडे आहेत. त्यांना एकूण सहा मुले आहेत. मुलांपैकी तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.