Bengaluru Water Crisis: होळी दरम्यान रेन डान्स आणि पूलमध्ये पिण्यायोग्य पाणी वापरण्यास सक्त मनाई,BWSSB जारी केले निर्देश
तरीही या शहरात पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे.
Bengaluru Water Crisis: बेंगळूरु हे देशात सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिध्द आहे. तरीही या शहरात पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. बेंगळूरु शहरात पाण्याची समस्या असल्याने होळीच्या सणादरम्यान पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे. बेंगळुरु पाणी पुरवठा आणि सीवरेज बोर्ड (BWSSB) ने बुधवारी होळीसाठी सुचना जारी केली आहे. सूचनांमध्ये जारी केल्या प्रमाणे, मंडळाने होळी उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये पिण्यायोग्य पाणी वापरण्यास मनाई केली आहे.
BWSSB चे अध्यक्ष व्ही. रामप्रसथ मनोहर यांनी निर्देशामध्ये जारी केली की, होळी सणाच्या दरम्यान सांस्कृतिक उत्सवांवर कोणतेही निर्बंध नाही परंतु खेळण्यासाठी रेन डान्स आणि पूल डान्स आयोजिक करणे योग्य नाही त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी, कावेरीचे पाणी किंवा बोअरवेलचे पाणी रेन डान्स आणि पूर डान्स ॲक्टिव्हिटीसाठी वापरू नका.
रेन डान्स आणि पूस डान्ससह शहरात होळीच्या 70 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी पाणी टंचाईच्या काळात पाण्याच्या अपव्ययाबाबत चिंता व्यक्त केली. BWSSB ने कावेरीचे पाणी आणि बोअरवेलचे पाणी पूल पार्ट्यांसाठी आणि होळी दरम्यान आयोजित केलेल्या रेन डान्ससाठी व्यावसायिक हेतूने वापरण्यास मनाई केली आहे.