Karnataka Shocker: नाश्ता न दिल्याने तरुणाने केली आईची हत्या; आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
नेत्रावतीची तिच्याच मुलाने लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. आरोपी अल्पवयीन आहे. तो मुलबागीलू येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. आरोपी मुलाची चौकशी करण्यात येत आहे.
Karnataka Shocker: सकाळी नाश्ता (Breakfast) बनवला नाही म्हणून संतापलेल्या मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या (Murder) केली. ही घटना शुक्रवारी सकाळी बेंगळुरू (Bengaluru) येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर आरोपींनी केआर पुरा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. केआर पुरा येथील न्यायमूर्ती भीमैया लेआउट येथे राहणाऱ्या नेत्रावती (वय, 40) यांची हत्या करण्यात आली. आरोपी 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील मुलाबगीलू येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेला आरोपी गुरुवारी घरी आला होता. रात्री आई आणि मुलामध्ये भांडण झाले. तो रागावला आणि न जेवता झोपला. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी तयार झाला. सकाळी 7.30 वाजता आई नाश्ता न करता झोपत असल्याचे पाहून त्याला राग आला. त्याने नाश्ता का बनवला नाही असा प्रश्न आईला विचारला. त्यानंतर रागाच्या भरात नेत्रावतीनेही त्याला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. (हेही वाचा -Murder Over Girlfriend Remarks: प्रेयसीबद्दल अनुद्गार, 24 वर्षीय तरुणाची हत्या)
दरम्यान, संतापलेल्या मुलाने घरात उपस्थित असलेल्या लोखंडी रॉडने नेत्रावती यांच्या डोक्यात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले. नेत्रावती यांचे कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून केआर पुरा येथे राहत होते. (हेही वाचा - Delhi Crime: दिल्लीतील बुरारी येथे राहत्या घरात सापडला महिलेचा मृतदेह, हत्या झाल्याचा संशय)
नेत्रावती आणि तिचा मुलगा भाड्याच्या घरात राहत होता. मुलगा मुळाबगीलू येथे शिकत असल्याने ते मूळ येथे वास्तव्यास होते. डीसीपी शिवकुमार यांनी सांगितले की, आज सकाळी सात ते आठच्या सुमारास ही हत्या झाली. नेत्रावतीची तिच्याच मुलाने लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. आरोपी अल्पवयीन आहे. तो मुलबागीलू येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. आरोपी मुलाची चौकशी करण्यात येत आहे.