Bengaluru Shocker: पत्नीला खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी, आरोपी पतीला अटक, बेगंळुरू येथील घटना

पतीने पत्नीला तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Bengaluru Shocker: बेंगळूरू येथे पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्यानंतर एका पतीने क्रुरतेची हद्दच पार केली आहे. पतीने पत्नीला तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. किरण पाटील असं आरोपीचे नाव आहे. आरोपीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते त्यामुळे त्याला दुसरे लग्न करायचे होते. दरम्यान त्याने पत्नीशी घटस्फोट मागित्यास नकार दिला होता. आरोपी पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. याबाबत महिलेने पोलिस तक्रार देखील केली होती त्यानंतर ही पतीचे घरगुती हिंसाचार थांबवला नाही. (हेही वाचा- महिलेचा फोन हॅक करत Private Photos वरून ब्लॅकमेलिंग करणार्‍या पुरूषाला पुण्यात अटक)

पोलिस चौकशीत पीडित महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की तिचा पती तिला तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेन असा ब्लॅकमेल करत आहे आणि तिने घटस्फोट न दिल्यास ते सोशल मीडिया फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.  पीडित महिलाच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आणि 27 डिसेंबर रोजी आरोपीला चौकशीसाठी बोलवले.

दरम्यान पोलिसांनी त्याचा फोन देखील तपासला. आरोपीला अटक होण्याचा संशय आल्याने तो पोलिस स्टेशन मधून पसार झाला. त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. विष प्राशन केल्यावर तो पोलिस ठाण्यात पुन्हा आला आणि विष घेतल्याचा दावा केला.पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णलायात पाठवले. उपचारानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यानंतर आरोपी पतीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला आहे.



संबंधित बातम्या