बंगळुरु: एका चुकीच्या Google Search मुळे महिलेने गमावली बँक खात्यामधील सर्व रक्कम

मात्र बंगळुरु (Bengaluru) येथील एका महिलेला चुकीचे गुगल सर्च करणे महागात पडले आहे. या प्रकरणी महिलेच्या बँक खात्यामधील सर्व रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Search| Image only representative purpose (Photo credit: pxhere)

देशातील बहुतांश नागरिक हे एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. मात्र बंगळुरु (Bengaluru) येथील एका महिलेला चुकीचे गुगल सर्च (Google Search) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी महिलेच्या बँक खात्यामधील सर्व रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या नागरिकांची फसवणुक ही कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी होईल हे सांगणे थोडे मुश्कीलच आहे. मात्र आता फसवणुक करणाऱ्यांनी आता गुगलला सुद्धा टार्गेट केले असून या माध्यमातून नागरिकांची लुटमार करण्याच्या प्रयत्न करत आहेत.

एका महिलेने झोमॅटो (Zomato) अॅपच्या कस्टमर केअरचा क्रमांक न मिळाल्याने तिने तो गुगल सर्च केला. मात्र सर्च केल्यानंतर गुगलवर दाखवण्यात आलेला क्रमांकावर महिलेने फोन केला खरा. पण महिलेने रिफंड मिळावा म्हणून मदत मागितली असता तिने बोलण्याबोलण्यातून तिच्या बँक खात्याची माहिती फोनवरील व्यक्तीला दिली. फोनवर बोलून झाल्याच्या काही वेळातच महिलेच्या बँक खात्यामधील सर्व रक्कम चोरी झाल्याचा प्रकार घडल्याचा तिचा लक्षात आला. यावर महिलेने तातडीने पोलिसात धाव घेत घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.(Paytm युजर्स सावधान! स्मार्टफोनमध्ये 'हे' अ‍ॅप असल्यास बँक खात्यामधून चोरी होतील पैसे)

पीडित महिलेने गुगलवर सर्च केलेला झोमॅटोच्या कस्टमर केअरचा क्रमांक हा खोटा होता. तर झोमॅटोकडून याबद्दल फेक कॉल सेंटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नई मधील एका महिलेसोबत सुद्धा हाच प्रकार घडणार होता. मात्र महिला फसवणुक होण्यापासून बचावली. त्यावेळी महिलेला बँक खात्याचा क्रमांक सांगा असे म्हणताच तिला हा फोन खोटा असल्याचे समजून आले होते.