Bengaluru Car fire: जेपी नगरमध्ये रस्त्याच्या मध्यभागी इलेक्ट्रिक कारला आग, घटना कॅमेरात कैद

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Bengaluru: Car Fire Video

Bengaluru Car fire: इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर येत होत्या, मात्र कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक कारला (Electric Car) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिक कारने पेट घेतला आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. इलेक्ट्रिक कारमधून मोठ्या प्रमाणात आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीला आग लागल्यानंतर ती पूर्णपणे जळून खाक झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

बेंगळुरूमधील जेपी नगर भागात शनिवारी 30 सप्टेंबर रोजी घटना घडली. कार जेपी नगरमधील दालमिया सर्कलजवळ आली असता पेट घेतला. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.