Rajnath Singh: 'अनपेक्षित संघर्षांसाठी तयार राहा'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वरिष्ठ नौदलाच्या अधिकार्‍यांना आवाहन

सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा रणनीती बनवण्यास भाग पाडले आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले .

Rajnath Singh | (Photo Credits-Facebook)

Rajnath Singh: वाढत्या धोक्यांना प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, सशस्त्र दलांनी भविष्यातील क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच किनारपट्टीवर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर उच्च ऑपरेशनल तत्परता राखली पाहिजे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सोमवारी वरिष्ठ नौदलाच्या अधिकार्‍यांशी बोलताना सांगितले. राजनाथ सिंग म्हणाले, भविष्यातील संघर्ष अप्रत्याशित असतील. त्यासाठी तयार राहा. सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा धोरण आखण्यास भाग पाडले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवरील नौदल कमांडर्सच्या परिषदेला हजेरी लावली. वास्तविक सोमवारपासून नौदलाच्या कमांडर कॉन्फरन्सला सुरुवात झाली आहे. आयएनएस विक्रांतवर समुद्राच्या मध्यभागी कमांडरची ही बैठक पहिल्यांदाच होत आहे. पाच दिवस चाललेल्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या सर्वोच्च कमांडर्सना संबोधित केले. (हेही वाचा - Tripura New CM: अखेर ठरलं! माणिक साहा होणार त्रिपूराचे नवे मुख्यमंत्री; 8 मार्चला घेणार शपथ)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, उत्तर आणि पश्चिम सीमेवर तसेच किनारपट्टीवर सतत जागरुकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्षा मंत्री यांनी खंबीरपणा, धैर्य आणि समर्पणाने राष्ट्रहिताचे रक्षण केल्याबद्दल नौदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भविष्यातील संघर्ष अप्रत्याशित असतील आणि सशस्त्र दलांनी उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा रणनीती बनवण्यास भाग पाडले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करेल. सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी त्यांनी कमांडर्सना भविष्यातील क्षमता विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. पुढील 5-10 वर्षांत संरक्षण क्षेत्रामार्फत USD 100 बिलियन पेक्षा जास्त किमतीची ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. देशाच्या आर्थिक विकासात ते प्रमुख भागीदार बनेल.

मिळालेल्या माहितीनुसार, परिषदेत सुरक्षेशी संबंधित लष्करी आणि सामरिक पातळीवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. याशिवाय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, प्रशिक्षण, मानव संसाधन आणि भविष्यातील योजना यावरही चर्चा होणार आहे. यादरम्यान कमांडर हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांवरही चर्चा करतील.