Batteries, Razor Blade Fragments, Screws: 14 पेन्सिल, बॅटरी, पिन, ब्लेड...; पोटातून काढल्या 65 वस्तू, शस्त्रक्रियेच्या काही तासात 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मात्र दुर्देवाने शस्त्रक्रियेच्या काही तासानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit- X

Batteries, Razor Blade Fragments, Screws: उत्तर प्रदेशच्या हातरसध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या पोटातून 14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड, फुग्यांसहित 65 वस्तू काढल्या (Metal Objects in Stomach) आहेत. डॉक्टरांनी 28 ऑक्टोबर रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) केली. मात्र दुर्देवाने त्याला वाचवता आले नाही. शस्त्रक्रियेच्या काही तासानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Viral Video: देवासमध्ये तरुणांची गुंडगिरी! झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला 13 ऑक्टोबर रोजी पोटाचा त्रास होऊ लागला आणि श्वास घ्यायलाही अडथळा वाटू लागला. ज्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्याला आगरा येथील रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्याला जयपूरच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र नेमके कारण समजले नाही. त्यानंतर त्या मुलाला अलिगडच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.

26 ऑक्टोबर रोजी त्याची पोटदुखी वाढली त्यामुळे कुटुंबिय त्याला पुन्हा अलिगडच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्याच्या पोटाचे अल्ट्रासाउंड केले असता त्याच्या पोटात वस्तू असल्याचे कळले. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला सफदरगंज रुग्णालयात पोहोचले.रुग्णालय प्रशासनानुसार, अल्पवयीन मुलाचा जीव वाचविण्यासाठी पोटातल्या वस्तू बाहेर काढणे गरजेचे होते. (हेही वाचा: Raebareli: पोलिसांकडून गौरवर्तण, थुंकी चाटण्यास भाग पाडले; गावप्रमुखाचा दावा)

पोटातून काढल्या 65 वस्तू

पाच तासांची जटील शस्त्रक्रिया करुन त्या वस्तू बाहरे काढण्यात आल्या. त्या वस्तू 368 ग्रॅमच्या होत्या. त्या अल्पवयीन मुलाने त्या वस्तू गिळल्या होत्या.मात्र त्या वस्तूंमुळे त्याच्या आतड्यांना संसर्ग झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.