Bangladeshi Smugglers Attacked Jawan: बांगलादेशी तस्करांचा BSF जवानांवर हल्ला; प्रत्युत्तरादाखल एक तस्कर ठार
ही घटना 11-12 ऑगस्टच्या रात्री घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या तस्करांना सैनिकांनी प्रत्युत्तर दिले, ज्यात एक तस्कर ठार झाला. झडतीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
Bangladeshi Smugglers Attacked Jawan: पश्चिम बंगाल (West Bengal) मधील मालदा जिल्ह्यात (Malda District) भारत-बांगलादेश सीमेवर (India-Bangladesh Border) धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या एका बांगलादेशी तस्करांच्या गटाने (Bangladeshi Smugglers Group) बीएसएफ जवानांवर (BSF Personnel) हल्ला केला. ही घटना 11-12 ऑगस्टच्या रात्री घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या तस्करांना सैनिकांनी प्रत्युत्तर दिले, ज्यात एक तस्कर ठार झाला. झडतीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, 115 व्या बटालियनच्या सीमा चौकी चांदनीचक येथे ड्युटीवर असलेल्या जवानाने 5-6 जणांना काही सामान घेऊन जाताना पाहिले. जवानाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तस्करांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. जवानांनी स्वसंरक्षणार्थ बांगलादेशी तस्करांवर एक राऊंड गोळीबार केला. गोळीबार होऊनही तस्कर बांगलादेशच्या दिशेने जात राहिले. यानंतर जवानांनी केलेल्या गोळीबारात एक तस्कर ठार झाला. (हेही वाचा - West Bengal: भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई; 12 कोटींची 89 सोन्याची बिस्किटे जप्त)
झडतीदरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अब्दुल्लाह असे मृत तस्कराचे नाव असून तो मूळचा बांगलादेशचा आहे. हा तस्कर बांगलादेशच्या BGB (बॉर्डर गार्ड बांगलादेश) चा सुरक्षा घेरा ओलांडून विडी पानांची खेप घेऊन जाण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसला होता. (हेही वाचा - India-Bangladesh Border वर Terrorists आणि सुरक्षा दलांत चकमक, एक जवान शहीद)
ANI ट्विट -
दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. पश्चिम बंगालच्या अनेक सीमावर्ती भागात अशा घटना घडत आहेत. बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते ए के आर्य यांनी सांगितले की, अशा घटना आमच्यासाठी असामान्य नाहीत. बीएसएफचे जवान कमालीचे धैर्य आणि सतर्कतेने आपले कर्तव्य बजावत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)